● वर्मीवाॅश / गांढुळपाणी शेतीतील फायदे ●
सेंद्रिय शेवगा शेती मध्ये गांढुळ पाण्याचे विशेष महत्व आहे.
• गांडूळ च्या शरीरातून नेहमी एक स्त्राव स्रवत असतो.
• या स्त्रावला " Coelomic Fluid " असे म्हणतात. " कोलॅमिक फ्लूड " नावाचा पिवळसर स्त्राव हा गांढुळासाठी वंगणाचे काम करत असतो.
• या स्त्रवामुळे गांडूळाच्या शाररिक हालचाली, श्वासोच्छ्वास व इतर प्रक्रिया सुलभ होतात.
• कोलॅमिकच्या स्त्रावात बुरशीनाशक गुणधर्म तर असतातच, याशिवाय
- नत्र-1.32%,
- स्फुरद-0.72%,
-पालाश-0.65%
आणि नैसर्गिक सूक्ष्म अन्नद्रव्येसुद्धा असतात.
गांडूळपाण्यात काही संप्रेरके देखील असल्याचे काही अभ्यासात दिसून आलेले आहे.
• गांडूळपाणी हे पिकांना फवारणीद्वारे किंवा जमिनीतून सुध्दा देता येते.
• व्हमीरवाॅशची फवारणी घेत असाल तर, दोन फवारणी मधील अंतर हे कमीतकमी 12 दिवसांचे ठेवावे.
• शेवग्यामध्ये व्हमीरवाॅशची फवारणी ही झाडाच्या वाढीच्या अवस्थेत, फुलोरा अवस्थेत तसेच फळधारणा अवस्थेत ही घेऊ शकता.म्हणजेच शेवगा बागेच्या सर्व अवस्थेमध्ये गांढुळपाणी वापरता येते, याच्या वापराचे कसलेही दुष्परिणाम शेवगा झाडावर होत नाहीत.
● गांढुळपाण्याचे शेवगा शेतीत होणारे फायदे खालीप्रमाणे.
• झाडावरील बुरशी नाहीशी होते.
• जमिनीतून दिल्यास, पांढ-या मुळ्यांची संख्या वाढवण्यास मदत करते.
• नत्र, स्फुरद, पालाश आणि सूक्ष्मअन्नद्वव्ये नैसर उपलब्ध स्वरुपात व सूक्ष्म अन्नद्वव्ये उपलब्ध स्वरुपात असल्यामुळे झाडाची सर्वांगीण वाढ होण्यास मदत होते.
• नवीन फुटवे फुटण्यास तसेच जास्त कळी निघण्यास मदत होते.
• पानांचा रंग हिरवा राखून, पानगळ कमी करण्यास मदत करते.
• फळधारणा अवस्थेत गांढुळपाण्याची फवारणी नियमित घेत राहिल्यास, शेंगावरील बुरशी नाहीशी होते, शेंगांचा रंग हिरवागार होतो, तसेच शेंगावरील तंबूसपणा नाहीसा होतो.
• परिणामी उत्पादन क्षमतेमध्ये वाढ होते, शेंगांची प्रत सुधारते.
• झाड निरोगी राहते, मुळांची अन्नद्रव्ये शोषण्याची क्षमता वाढते.
• त्यामुळे, गांढुळ खतासोबतच, गांढुळ पाण्याचाही वापर हा सातत्याने करावा, जेणेकरून खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ होईल.
• शेतकरी शेतातच गांढुळपाणी तयार करू शकतात, गांढुळ पालनासाठी बेड मिळतात, त्यात छोट्या प्रमाणावर गांढुळखत व गांढुळपाणी अत्यल्प खर्चात तयार करता येऊ शकते.
● गांढुळपाणी वापरण्याचे प्रमाण ●
• प्रति एकर जमिनीतून देण्यासाठी..
200 लिटर पाण्यात - 50 लिटर गांढुळपाणी.
• फवारणी साठी..
• 15 लिटर पंपाला - 100 मिली गांढुळपाणी.
• गांढुळपाण्याच्या नेहमीच्या वापराने, रासायनिक खतांचा वापर कमी होतो, झाडे निरोगी राहतात, खर्च कमी होती, परिणामी उत्पन्नात वाढ होते.
धन्यवाद.
Team ThinkingMindRJ.
YouTube channel - https://www.youtube.com/channel/UClrzu1cvQt2oQhdr8-cfB3w
Facebook Group - https://www.facebook.com/groups/1935581189829806/?ref=share
No comments:
Post a Comment