Tuesday, November 9, 2021

शेवगा शेती नियोजन





 नमस्कार मित्रांनो,



पाऊस उशिरा गेल्यामुळे शेवगा शेतीत फुलोरा व सेटिंग उशिरा होताना दिसत आहे.


ज्या ठिकाणी मागील 1 महिन्यापासून पाऊस संपलेला आहे, त्या ठिकाणी चांगला फुलोरा व सुतळी च्या आकाराच्या शेंगा लागलेल्या दिसत असतील, पण हे सेटिंग पूर्ण प्लॉट मध्ये नसून काही तुरळक झाडांना दिसून येत असेल..


आता काही महत्वाच्या गोष्टी करणे गरजेचे आहे, जेणेकरून आपण व्यवसायिक उत्पन्न घेऊ शकू..


 

*महत्वाचे 7 मुद्दे खलील प्रमाणे..*

(एक महिन्याचे नियोजन)



• सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे पाण्याचा ताण देणे.

यावर आपल्या ThinkingmindRJ या युट्युब चॅनल वर यासंदर्भात व्हिडीओ देखील आहे.

- हलकी जमीन असेल तर 5-6 दिवसांचा ताण आवश्यक आहे.

- भारी जमीन असेल तर 10-15 दिवसांचा ताण देऊ शकता.


• दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे खत नियोजन..

- झाडांना काहीच फुले नसतील तर एकदा 12:61:00 हे 5 किलो किंवा 7 किलो एकरी देणे,(ड्रीप द्वारे किंवा आळवणी करणे)

- त्यानंतर 8 दिवसांनी 00:52:34 हे खत 5 ते 7 किलो एकरी देणे.

00:52:34 हे खत 8 दिवसाच्या अंतराने 3 कमीत कमी तीन वेळा देणे गरजेचे आहे.


• तिसरा मुद्दा.. जेव्हा 00:52:34 हे खत द्याल, त्याच्या तिसऱ्या दिवशी Nitrobenzene (Boomflower) ची फवारणी करणे (2 वेळा) प्रमाण - 2 मिली प्रति लिटर.


• चौथा मुद्दा.. प्लॉट मध्ये काहीच फुले नसतील तरच शेंडा छाटणी करावी, अंदाजे 4 इंच शेंडा खुडवा. फुलोरा असेल तर शेंडा छाटणी करू नये. कारण शेंड्याजवळच कळ्यांचे मणी सारखे तुरे लागलेले असणार आहेत.


• पाचवा मुद्दा.. सध्या थंडीचे वातावरण आहे, त्यामुळे 10 ते 15 दिवसाच्या अंतराने कीटकनाशक + बुरशीनाशक यांची फवारणी करावी, जेणेकरून संभाव्य बुरशीजन्य रोग व अळीचा प्रादुर्भाव आपण रोखू शकतो.


• सहावा मुद्दा.. ड्रीप द्वारे किंवा आळवणी ने दिल्या जाणाऱ्या खतांसोबत TMT-Allrounder दिल्यास उत्तम परिणाम दिसून येतो असा अनुभव आहे, TMT-Allrounder मुळे फुले जास्त येऊन फुलगळ कमी होते, तसेच सेटिंग होण्यास मदत होते. शेंगांची क्वालिटी उत्तम बनते.

(TMT- All-rounder साठी..

रवींद्र जावके - 7387655897 किंवा

 नितीन कोटमे - 9403696714 

यांना कॉल करू शकता.)


• सातवा मुद्दा.. 30% पेक्षा जास्त झाडास फुले लागल्यानंतर, नैसर्गिक परागीभवणासाठी मधमाश्यांना आकर्षित करणे गरजेचे ठरते.

त्यासाठी ताक+गूळ+विलायची याची फवारणी करावी.

प्रमाण - 15 लिटर पंपासाठी..

- अर्धा लिटर ताक

- 50 ग्राम गुळ

- 4 - 5 विलायची (पावडर करून पंपात टाकणे)


ही फवारणी आठवड्यातून एकदा असे 4 वेळा केल्यास, मधमाश्या प्लॉट मध्ये दिसून येतील.

काही मित्रांच्या शेतातच मधमाश्यांचे मोहोळ बसलेले दिसून आले आहे.😊



धन्यवाद.🙏



डॉ. रवींद्र जावके.

फोन - 7387655897

*(कॉल वेळ* - *दुपारी 3 ते 5 किंवा रात्री 9 ते 11)*

*Youtube Channel* - *ThinkingMindRJ*

*फेसबुक ग्रुप* - *" शेवगा शेती फक्त "*

No comments:

Post a Comment

शेवगा शेती नियोजन

 नमस्कार मित्रांनो, पाऊस उशिरा गेल्यामुळे शेवगा शेतीत फुलोरा व सेटिंग उशिरा होताना दिसत आहे. ज्या ठिकाणी मागील 1 महिन्यापासून पाऊस संपलेला आ...