● शेवगा सेटिंग आणि मधमाशी●
🐝🐝🐝🐝🐝🐝🐝🐝🐝🐝🐝🐝🐝
सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टीन यांचे एक महत्वाचे वाक्य म्हणजे..
" ज्या वेळी मधमाशी या जगातून संपेल, त्या नंतर अवघ्या चार वर्षानंतर, मनुष्य जातीचे अस्तित्वच संपुष्टात येईल."
• मधमाशीमुळे होणाऱ्या परागीभवणातून फळधारणा तर होतेच, याशिवाय फळाची प्रत ही सुधारते, तसेच फुलगळ होण्याचे प्रमाण कमी होते.
• पुष्प वनस्पतींना मधमाशीचा होणारा स्पर्श हा परिस स्पर्शापेक्षा कमी नाही, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
• यामुळेच मधमाशीला सामाजिक कीटक असे देखील म्हटले जाते.
• मधमाशी अतिशय महत्वाचे काम करत असते, चिकाटी वृत्तीचा धडा मधमाशीपासून मानवाने घ्यावयास हवा. तसेच समूह काम म्हणजेच टीम वर्क, याचाही मधमाशी एक उत्कृष्ट उदाहरण आहे.
• न थकता, अविरत श्रम करून मधासारखा अविनाशी पदार्थ निर्माण करत असते.
• पराग सिंचनामुळे शेती उत्पादनात वाढ होत असतेच, तसेच मध व मेण हे नैसर्गिक पदार्थ देखील मानवास उपलब्ध मधमाशी मुळे उपलब्ध होतात.
• शेवगा शेतीत मधमाशीचे खूप महत्व आहे. शेवग्याच्या फुलांचा देठ हा नाजूक असल्याकारणाने ही फुले लवकर गळतात. पाऊस किंवा वादळात शेवग्याची असंख्य फुले गळताना दिसतात.
• अशी फुलगळ होण्याअगोदर जर या फुलांची सेटिंग झाली, म्हणजेच नर व मादी परागकणांचे मिलन होऊन शेंग निर्मिती झाली तर होणारे संभाव्य नुकसान टाळता येऊ शकते.
• शेवग्याच्या फुलांचा रंग व गंध हा मधमाश्यांना लांबून आकर्षित करत असतो, फुले ही झुपक्याने लागत असल्यामुळे ती दुरूनच दिसतात.
• पाळीव किंवा जंगली मधमाश्या, तात्काळ शेवगा फुलांकडे आकर्षित होताना दिसून येतात.
• मधमाश्यांच्या उपस्थितीत शेंगधारणा ही जास्त प्रमाणात होते.
• शेवगा उत्पादनात सुमारे २५ ते ३५% एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढ होते.
• मधमाश्यांच्या प्रजाती खलील काही प्रजाती आहेत,
- भारतीय माशी (ॲपिस सेरेना इंडिका)
- युरोपियन माशी (ॲपिस मेलिपेरा)
- आग्या माशी (ॲपिस डॉरसेटा)
- लहान माशी (ॲपिस फ्लोरिआ)
वरील मधमाश्यांपैकी 'भारतीय माशी' आणि 'युरोपियन माशी' पेटीत पाळता येतात.
• भारतीय माशी' आणि 'युरोपियन माशी' यांचे मधमाशी पालन करून रोजगार निर्मिती करता येते.
• शेवगा शेतीला जोडधंदा म्हणुन मधमाशी पालन हा एक उत्तम व्यवसाय ठरू शकतो, यात शंका नाही.
● मधमाशीपालनाचे मानवास होणारे फायदे●
• अनेक पिकामध्ये मधमाश्यांद्वारे परागीकरण झाल्यामुळे उत्पादन वाढते.
• मध तर मिळतेच, सोबतच मेणाचेही उत्पादन मिळते. विविध सौंदर्यप्रसाधने, अनेक प्रकारची औषधे तयार करण्यासाठी मध आणि मेणाचा उपयोग केला जातो.
• मधमाशीपालन शेती, फळबाग, भाजीपाला लागवड व कोणत्याही पूरक उद्योगाशी स्पर्धा करत नाही.
• नैसर्गिक परागीभवणासाठी मधमाशी पेटी भाड्याने किंवा विकत देली जाते.
• पर्यावर्णकचे संतुलन राखल्याने समाधान मिळते. पौष्टिक अन्न खावयास मिळते.
• मधमाशी पालनासाठी आवश्यक तंत्रांचे प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. याच्या ट्रेनिंग महाराष्ट्रात विविध ठिकाणी होत असतात. प्रशिक्षण घेऊनच मधमाशी पालनाचा व्यवसाय करावा.
● मधमाशी वाचवणे आपले कर्तव्य आहे.●
• विषारी कीटक नाशकांच्या फवारण्या करू नये अथवा अपरिहार्यता असेल, तर अश्या फवारण्या संध्याकाळी कराव्यात.
• शेतातील अथवा बांधावरील, मधाची पोळी जाळून अथवा धूर देऊन काढू नये.
• मधमाशांनाउपयुक्त अश्या सपुष्प वनस्पतींची लागवड करणे. उदा. झेंडू इत्यादी.
• शेताच्या आजूबाजूला, मधमाश्यांची पोळे येण्यासाठी, मधमाशयांची अमिशांचा वापर जास्तीतजास्त करावा.
• परागीभवनामुळे लाभ होणाऱ्या भाज्या, फळे आणि फुले खालीलप्रमाणे,
• भाज्या - शेवगा, कांदा, कोबी, मुळा, दोडका, कारली, काकडी, भोपळा, गाजर इ.
• फळे - डाळिंब, संत्री, पेरू, स्ट्राँबेरी, काजू, नारळ, लिंबू इ.
• फुले - शेवंती, झेंडू, गलांडी, इ.
• पिके - मोहरी, सूर्यफूल, बाजरी इ.
● पूर्ण मानव जातीवर, मधमाशीचे मोठे उपकार आहेत. मधा सारखे अमृत निर्माण करणाऱ्या या किटकाचे अस्तित्व दिवसेंदिवस धोक्यात येत आहे. मधासाठी पोळी जाळणे,विषारी कीटक नाशके फवारणे, मोबाईल टोवर उभारणे,मधमाश्या विषयी असलेले अज्ञान पसरवणे, या सर्व कारणांमुळे एक उपयुक्त जीव संपण्याच्या मार्गावर आहे.यासाठी आपण सर्वाने मधमाशीचे संरक्षण करणे गरजेचे झाले आहे.
धन्यवाद.
Team ThinkingMindRJ.
YouTube channel - https://www.youtube.com/channel/UClrzu1cvQt2oQhdr8-cfB3w
Facebook Group - https://www.facebook.com/groups/1935581189829806/?ref=share
No comments:
Post a Comment