●शेवगा लागवड अंतर.●
• शेवगा लागवड करताना काही महत्वाच्या बाबींमध्ये शेवगा लागवडीचे योग्य अंतर ठरवणे महत्वाचे असते.
• शेवगा लागवडीचे अंतर ठरवताना खलील बाबी विचारात घेणे गरजेचे ठरते.
- शेवगा लागवडीचे क्षेत्र.
- जमीन ( भारी/मध्यम/हलकी इत्यादी)
- आपल्याकडील पर्जन्यमान.
- आंतरपिके घेणे / न घेणे.
- इत्यादी बाबी विचारात घेऊन शेवगा लागवडीचे उत्तम अंतर ठरवता येते.
• शेवगा झाडाच्या मुळांचा विस्तार इतर मोठ्या झाडांप्रमाणे जरी नसला, तरी संयुक्त मुळ्या ह्या जास्त प्रमाणात आजूबाजूला पसरलेल्या असतात.
• एक मजबूत सोटमुळ सरळ खाली जाते व त्यास अनेक उपमुळ्या/ संयुक्त मुळांचे जाळे तयार होते.
• ह्या संयुक्त मुळांचे जाळे हे झाडाच्या घेरानुसार कॅनोपीनुसार आजूबाजूला विस्तारलेले असते.
• त्यामुळे जमिनीचे भौतिक गुणधर्मानुसार लागवडीचे अंतर ठरवावे, जेणेकरून पुढील 8 ते 10 वर्षे शेवग्याचे व्यावसायिक उत्पन्न घेण्यास कसलीही अडचण येऊ नये.
• महाराष्ट्रामध्ये विविध अंतरावर शेवग्याची लागवड करण्यात येते, तसेच त्यात विविध आंतरपिके देखील घेतली जातात. अंतरपिकांबद्दल आपण पुढील लेखात बोलूयात.
● शेवगा लागवडीचे विविध अंतरे खालीलप्रमाणे.
• 12 × 6
• 12 × 5
• 10 × 6
• 10 × 5
• 8 × 6
• 8 × 5
• 8 × 8
• 10 × 10
• 12 × 10
• 8 × 6 + 1
• 10 × 6 + 1
• 12 × 6 + 1
इत्यादी नानाविविध अंतरावर, महाराष्ट्रात शेवग्याची लागवड पहावयास मिळते.
As a Thinkinhmind team आम्ही खलील दोन लागवडीचे अंतरे घेण्याचा सल्ला देत असतो.
• 12 × 6 + 1
• 10 × 6 + 1
• वरील दोन अंतरानुसार त्याच लागवडीच्या क्षेत्रात जवळपास दुप्पट झाले बसतात व उत्पन्नात देखील वाढ होते, असे अनेक शेवगा शेतकऱ्याचे अनुभव आहेत.
• 12 × 6 + 1 अंतर म्हणजे,
दोन ओळींमधील अंतर हे 12 फूट.
दोन झाडांमधील अंतर हे 6 फूट.
आता या 6 फुटवरील झाडापासून 1 फुटावर दुसरे झाड लावावे, असे प्रत्येक 6 फुटवरील झाडानंतर 1 फुटावर दुसरे झाड लावावे.जेणेकरून झाडांची संख्या दुप्पट होते.
• अशी लागवड करताना शेतकऱ्याच्या मनात हा प्रश्न येणे स्वाभाविक आहे, की एक फुटावर दोन झाडे लावली तर त्यांच्यात स्पर्धा होऊन झाडांच्या वाढीवर परिणाम होणार नाही का?
• एक फुटावर वरील पद्धतीने लागवड केल्यास, झाडांच्या वाढीवर परिणाम झालेला दिसून आला आहे, पण तो फक्त 8 ते 12 टक्के आहे. बाकीचे, म्हणजे जवळपास 90 टक्के, दोन्ही झाडे योग्यरीत्या वाढलेले दिसून आलेले आहेत.
• ज्याठिकाणी असे दिसून येईल की, एक झाड नीट वाढलेले आहे व दुसऱ्या झाडाची वाढ खुंटलेली आहे, अश्या ठिकाणी लहान झाड काढून टाकावे.
• मोसंबी, चिकू, आंबा, काजू, मिलियाडूबिया, पेरू, सीताफळ इत्यादी पिकामध्ये जर शेवगा लागवड करणार असाल तर, वरील झाडांच्या दोन ओळींमध्ये मध्यभागी शेवग्याची ओळ घ्यावी, व दोन्ही पिकांची ड्रीप व्यवस्था वेगवेगळी असावी.
• अधिक माहितीसाठी खलील व्हिडीओ पाहू शकता.
धन्यवाद.
Team ThinkingMindRJ.
YouTube channel - https://www.youtube.com/channel/UClrzu1cvQt2oQhdr8-cfB3w
Facebook Group - https://www.facebook.com/groups/1935581189829806/?ref=share
No comments:
Post a Comment