नमस्कार मित्रांनो,
मी रवींद्र जावके, आपल्या या ThinkingmindRJ या नवीन ब्लॉग वर आपल्या सर्वांचे स्वागत करतो.
शेवगा लागवडीसाठी जमीन कशी असावी?
• काळी , मध्यम, हलकी, मुरमाड, लाल, माळरानाची, डोंगर उताराची जमीन... इत्यादी प्रकारच्या जमिनीत आपण शेवगा लागवड करू शकतो.
• जमीन निवडताना महत्वाची गोष्ट लक्षात घेणे गरजेचे असते, ती म्हणजे, जमीन ही पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी. (पाणी धरून ठेवणारी जमीन शेवग्यास मानवत नाही.)
• लागवडी अगोदर जमीन व्यवस्थित नांगरून घेऊन 15 दिवस उन्हात वाळवून घ्यावी.
• जमीन वापरातील नसेल तर नांगरणीच्या वेळेस शेणखत टाकून घ्यावे.
• जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 असल्यास अतिउत्तम. या सामू मध्ये शेवगा चांगले उत्पन्न देतो.
• जमिनीत बिया लावून लागवड करणार असाल तर टोकन पद्धतीने लागवड करावी, रोप लावून लागवड करणार असाल तर खड्डे घेऊन लागवड करावी.
• लागवडी अगोदर जमिनिचा सामू तपासून घेतल्यास, पुढील खत पाण्याचे नियोजन व्यवस्थित करता येते.
• चुनखडीचे प्रमाण जास्त असलेली जमीन शेवग्यास मानवत नाही.
• जमिनीच्या प्रकारानुसार पाण्याचे व खतांचे प्रमाण व नियोजन करणे गरजेचे ठरते.
मित्रांनो या ब्लॉग मध्ये एवढेच, लवकरच नवीन मुद्यावर बोलू.
काही प्रश्न असतील तर खलील नंबर वर कॉल करू शकता.
रवींद्र जावके.
7387655897
(कॉल वेळ- दु.3-5 किंवा रात्री 9-11)